१)
एक हायड्रोजन-आयन
आणि एक प्रोटॉन या भिन्न गोष्टी आहेत की ती एकच गोष्ट आहे? आणि का?
२)
चंद्राची
पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा या
समप्रतलीय(इन द सेम प्लेन) नाहीत याचा सोपा आणि निर्विवाद पुरावा कोणता?
३)
विषुववृत्ता जवळील
प्रदेशातील मूळ निवासींचा रंग काळा असतो हे तेथील भौगोलिक परिस्थितिशी झालेले
अनुकूलन आहे काय?
४)
भारतात उत्कृष्ट
तंतूवाद्ये (वीणा वगैरे) बनविण्याची परंपरा होती व आहे. असे असूनही तारेची लांबी,
तारेचा ताण आणि तारेची घनता यांचा स्पंदद्रुती(फ्रिक्वेन्सी) असणारा गणिती संबंध शोधण्याचे श्रेय पायथागोरस (तोच काटकोन-त्रिकोण फेम) यालाच
द्यावे लागते. असे का?
५)
पाणी असून घनरूपात
आहे पण जे बर्फ नव्हे असे काही असते काय?
१) नाव वेगळे द्यावे लागते आहे म्हणून भिन्न आहेत! (म्हणूनच रसायन शास्त्रात नेहेमी काठावर सुटायचो)
ReplyDelete२) दोन्ही एक प्रतलीय असत्या तर केवळ सूर्यग्रहणच दिसत राहिले असते...
३) होय. थंड प्रदेशातील लोक गोरे असतात. मी आजवर तरी काळा नेपाळी किंवा इशान्य भारतीय पाहिलेला नाही. (वंशशुद्धी गृहित धरून)
४) याचे कारण आपल्या इथले कलाकार हे गणिताने फ़्रिक्वेन्सीज न ओळखता जाणिवेने ओळखू शकतात..आजही...मी १२ वीत (का ११वीत) असताना ट्युनिंग फ़ोर्क चा एक प्रयोग होता. बाईंनी मला २ फ़ोर्क आणून दिले ज्यावर एकच वारंवारितेचा आकडा छापलेला होता. पण कानाने ऐकल्यावर मला स्पष्ट फ़रक जाणवला इतकेच नव्हे तर अन्य कुठल्या स्वराशी तो जुळतोय तेही मी शोधून ती फ़्रिक्वेन्सी त्यांना सांगितली...बाई भडकल्या..मीही इरेला पेटलो...दोरी जोडून प्रयोग करायला लावले सर्वांसमक्ष आणि सर्व वर्गापुढे सिद्ध झाले की ती फ़ोर्क बनविणा-या कंपनीची प्रिंटिंग मिस्टेक होती.असो, परंतु हे शिकविता मात्र येत नाही. ताल ज्ञान व स्वर ज्ञान हे उपजत आले तरच येते असा कुण्याही संगितशिक्षकाचा सर्वमान्य अनुभव आहे.
आणि प्रश्नाचे उत्तर म्हणाल तर तंतुवाद्य सर्वत्र आहेत जगात,,,आपण आपली वाद्ये उत्तम बनवितो..गिटार्स नव्हे. (आता तीही कला अवगत आहे म्हणा)
५) पाणी असून का द्रवरूप असून? CO2 चा ड्राय आइस असतो तसा पण तो वायू आहे.
उत्तर असेही देता येईल= पाण्याचा जग (ज्यात पाणी असून तो घनरुपात आहे!)
थेट प्रत्ययाने होणारे ज्ञान महत्त्वाचे असतेच पण त्याचे व्यक्तीनिरपेक्ष सार्वत्रिकीकरण करायचे झाल्यास ते रीतीनिष्ठ बनवून घ्यावे लागते
Delete१> एकच.
ReplyDelete२> प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही हा.
३> काळा रंग मेलानिन मुळे येतो, हे द्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेते. विषुववृत्तीय प्रदेशात याची जास्त गरज असते. (याबद्दल मला १००% खात्री नाही... गूगल करता येईल पण त्यात काय मजा!)
४> भारतात काय होतं याच्या सुरस कथा इतक्या ऐकल्या आहेत कि माझा आता कशावरच विश्वास नाही. तरी मला वाटतंय कि भारतात ज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगाला महत्व जास्त असेल आणि त्यामागील जिज्ञासु वृत्ती कमी असेल (हे इतर शास्त्रामध्ये देखील दिसून येईल... जसे खगोलशास्त्र)
५> मार्कुरी?
चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे बरोबर आहे. इतरत्र जे फरक आहेत ते उत्तरे मध्ये प्रकाशित करीनच
Delete