Monday, December 14, 2015

होमिओपॅथीविषयी काही शंका


 होमिओपॅथी ही उपचार पद्धती व्यवहारात पुरेशी यशस्वी ठरत असली पाहिजे हे सध्या मी गृहीत धरले आहे. तिच्या सैद्धांतिक मांडणीविषयी मला पुढील प्रश्न पडतात.

१.     एखादे रसायन २००१०० (घातांक १००) इतके विरल(डायल्यूट) केले असता त्याचा रेणू गोळीत सापडणे हा मोठाच योगायोग असेल. यावरून, होणारी क्रिया रासायनिक नाही हे निश्चित. मग क्रिया नेमकी काय आहे?

२.     असे सांगितले जाते की अल्कोहोल या माध्यमावर मेंदूला वाचता येईल असा संदेश कोरला (इनस्क्राइब) जातो व या संदेशापासून मेंदूला कोणच्या प्रकारचे संकट आले आहे हे कळून (अबोध मनात) तो आपली इम्यून सिस्टीम तशी जागृत करतो. कोरले जाणे, छापले जाणे या क्रिया द्रव्यांवर अथवा ऊर्जांवर घडतात. हे कोणत्या स्वरूपाचे कोरणे किंवा छापणे असते? आणि मेंदूतील कोणत्या क्रियेवर त्याचा परिणाम होतो?

३.     ज्या प्रकारची घातक लक्षणे एखादा पदार्थ निर्माण करेल तोच पोटंटाइझ स्वरूपात औषध म्हणून कार्य करतो हे सिमिलिया सिमिलिबस क्यूरेंटर तत्त्व आहे. जसे की मधमाशीच्या विषाने जसा फोड येईल तसा फोड आल्यास पोटंटाइझ स्वरूपात मधमाशीचे विषच (एपिस मेलीफिका) देतात. पण अनेक मूळ पदार्थ अत्यंत निरुपद्रवी असतात (मीठ, खडू, राखुंडी इ.) तरी त्यांची पोटंटाइझ स्वरूपे वेगळ्याच लक्षणांना का उपयोगी पडतात?

४.     एखाद्या विषारी वनस्पतीचा अर्क काढून (मदर टिन्क्चर) नंतर परकशन्स डायल्यूशन वगैरे ठीक आहे. पण उदाहरणार्थ थायरॉइडच्या विकारावर थायरॉइडियम म्हणून औषध आहे, मग तो हायपर असो वा हायपो. त्याचा मूळ अर्क कोकराच्या थायरॉइडपासून काढतात असे सांगितले जाते. (कोकराला व्याधी आहे की नाही हे पाहिले जात नाही) आख्ख्या अवयवाचा रस काढल्यास तो त्यातील कोणत्या घटकाचा हे कळणे शक्य नाही. अशाही बाबतीत सिमिलिया सिमिलिबस क्यूरेंटर हे तत्त्व कसे लागू रहाते?

५.     व्यक्तीपरत्वे औषधे बदलतात. लक्षणे सोडून इतर अनेक व्यक्ती-वैशिष्ट्यांना लक्षणाइतकेच महत्त्व असते. मूळ विषे जेव्हा सिद्ध केली तेव्हा व्यक्ती निवडताना सर्व प्रकारच्या निवडल्या होत्या काय? कारण सर्व व्यक्ती-वैशिष्ट्ये  आणि व्याधींची लक्षणे यांच्या अनंत जुळण्या होतील. त्या जुळणीनिहाय औषधे सिद्ध झाली होती काय?

६.     होमिओपॅथीच्या प्रॅक्टिसमध्ये समाईक माहिती संग्रह का बनविला जात नाही?. तसेच प्लासिबो परिणाम नाही हे सिद्ध करणारी तुलनात्मक निरीक्षणांची सर्वेक्षणे का केली जात नाहीत? प्रकाशित का केली जात नाहीत?

७.     हानेमान यांच्या नंतर बाख फ्लॉवर वगळता नवी औषधे कोणती सापडली व ती कशी सिद्ध केली.

८.     कापराचा वास घेतला तर होमिओपॅथीच्या औषधांचा परिणाम नष्ट होतो असे म्हणतात. एकदा मेंदूला संदेश मिळाल्यावर तो वासांमुळे नष्ट का होतो?

९.     होमिओपाथ चूकही करू शकतो. पण गुण न येण्यापलीकडे धोका काहीच नसतो असे म्हणतात. जर परिणाम असेल तर दुष्परिणाम नसण्याचे काय कारण आहे?

१०.       आधुनिक वैद्यकातील औषध चालू असताना (म्हणजे अलोपॅथी) एकीकडे शिवाय होमिओपॅथी चालू ठेवायला डॉक्टर आक्षेप घेत नाहीत. मात्र काही होमिओपॅथ इतर औषधे बंद करायला सांगतात हे कसे?

15 comments:

  1. अनेलेटीकल केमिस्ट्री हे एक सायन्स आहे. खरे म्हणाल तर आधुनिक सायन्स आहे. त्यात एक मोठा भाग डीटेक्शन लिमिट ह्या कन्सेप्ट वर अधोरेखित आहे. ह्या अनेलेटीकल केमिस्ट्री मध्ये डीटेक्शन लिमिट ला लोअर लिमिट ऑफ डीटेक्शन असे ही संबोधले जाते. जर एखाद्या सोलव्हंट मध्ये एखादा मोलेक्युल प्रेझेन्ट नसेल तर त्या मोलेक्युल च्या दृष्टीने त्या सोलव्हंट कडे जर पहिले तर नसलेल्या मोलेक्युल च्या नसण्यामुळे जी व्हेल्यू येते त्याला ब्लेंक व्हेल्यू म्हणतात. मोलेक्युल असणे आणि मोलेक्युल नसणे ह्या कन्सेप्ट चे क्वन्तिफ़िकेशन म्हणजे डीटेक्शन लिमिट पण ही जी काही डीटेक्शन लिमिट आहे ती मोजतना कोन्फीडन्स लिमिट ही १% पाहिजेच. ब्लेंक चे स्टेनडर्ड डेव्हीएशन ( प्रमाणित मार्गच्युती) पण त्यात तेव्हडेच मोलाचे असते. असो ... डीटेक्शन लिमिट हे अनेक प्रकारचे असते जसे कि इनस्तृमेंट डीटेक्शन लिमिट, मेथड डीटेक्शन लिमिट. प्रेक्तीकल क्वन्तिफीकेशन लिमिट, किवा लिमिट ऑफ क्वन्तिफीकेशन. प्रत्येकाचा आवाका आपापल्या परीने एकाच प्लेटफोर्म वर जरी असला तरी वेगवेगळा आहे. होमिओपथी मधील मान्यवर लोकांनी जर आपल्या औषधांसाठी अनेलेटीकल केमिस्ट्री मध्ये काम केले तर अनेलेटीकल केमिस्ट्री मध्ये भर पडेल पण आम्ही होमिओपथि चे लोक आहोत आम्ही अनेलेटीकल केमिस्ट्री मध्ये काम करणार नाही अशीच भावना होमिओपथि च्या लोकांची राहते. अनेलेटीकल केमिस्ट्री शिकली तर अनेलेटीकल केमिस्ट्री च्या सहाय्याने होमिओपथि मधील अनेक चुकीच्या गोष्टी होमिओपथि च्या लोकांना कळतील. पण अनेलेटीकल केमिस्ट्री शिकली तर अनेलेटीकल केमिस्ट्री च्या सहाय्याने चुकीच्या पद्धतीची साक्ष देत येयील. साक्षीची बाटली अशी किती अशी भुते बाहेर काढणार आणि ती कोणाला पछाडणार, हा भयगंड कायमच महत्वाचा ठरला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. असे असेल तर हे रहस्य उलगडून त्याचा लाभही होऊ शकेल. अनॅलिटिकल केमिस्ट्री या विषयात रिसर्च करणारे कोण आहेत?
      त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे (पॅथीनिरपेक्षपणे) राजीव

      Delete
  2. जागतिक दृष्ट्या होमिओपथि हि alternate medicine मध्ये मोडते . इथे फ्रान्समध्ये डॉक्टर होमिओपथि मनात नाहीत . एकंदर होमिओपथि औषधे प्लासिबो पेक्षा जास्त उपयोगी ठरलेली नाहीत .
    आधिक माहिती ,
    https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy
    Homeopathy is not a plausible system of treatment, as its dogmas about how drugs, illness, the human body, liquids and solutions operate are contradicted by a wide range of discoveries across biology, psychology, physics and chemistry made in the two centuries since its invention.[7][12][13][14][15] Although some clinical trials produce positive results,[16][17] multiple systematic reviews have indicated that this is because of chance, flawed research methods, and reporting bias. Continued homeopathic practice, despite the evidence that it does not work, has been criticized as unethical because it discourages the use of effective treatments,[18] with the World Health Organisation warning against using homeopathy to try to treat severe diseases such as HIV and malaria.[19]

    Assessments by the Australian National Health and Medical Research Council and the Swiss and British government health departments have each concluded that homeopathy is ineffective, recommending against the practice receiving any further funding.[25]

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणजे इम्पिरीकली प्रूव्हड नाही. पण प्रक्रिया काय असू शकेल हे अंधारात आहे.
      राजीव

      Delete
  3. शंका भारी आहेत ! पण माझ्या संपर्कात कोणीही होमिओपॅथी-वादी नसल्याने प्रतिवाद करणे कठीण आहे ! पण आयुर्वेदाविषयी थोडी खडा-खडी शक्य आहे ! मग आयुर्वेदावर एक पोस्ट येऊ द्या, साने जी ! मग करू या चर्चा !

    ReplyDelete
    Replies
    1. वनस्पती आख्खी किंवा मूळ किंवा फळ यात झ इतक्या प्रकारचे रेणू असतात. त्यातील कोणता रेणू व का गुणकारी ठरतो हे जसे सापडत जाईल तसा आयुर्वेदावर आक्षेप रहाणार नाही. कारण रसायनशास्त्राच्या पलीकडे गेल्याचा दावा आयुर्वेदात मुळात नाहीच. सैद्धांतिक पातळीवर 'उष्ण''थंड' किंवा कफ वात पित्त या कटेगरी फार विस्तारित व संदिग्ध आहेत.
      तसेच उदाहरणार्थ कोणत्या शारीर क्रियेत सुवर्णाचा रेणू लागतो? इत्यादी गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात -----राजीव

      Delete
  4. He has made lot of statements which appear to be his assumptions on which he has raised lot of questions. Since i am not a homeopath, can't argue with him but wonder what are his credentials in homeopathy. Secondly, if we don't understand some mechanism today, does that mean that, it is can't exist? Pl note this is not meant to be a personal comment.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Hello Mr. Rajiv ,
    Really thanks for raising this , for two things 1. The people who still don't know what the homeopathy is would go and read about it and get enlightened!
    2. It's really good to know that you don't have a knowledge about Homoeopathy at all , but the doubts . But nevertheless all are important one .
    About few of your doubts , a learned person in chemistry would be a right person to answer . Nano mechanism of particles and molecules is the thing which has been under the lenses for quite sometimes now to explain its chemical and that way analytical way for actions .
    Homoeopathy itself believes in some different principle of vital force , which is not at all a chemical thing !
    If you want to understand the vital force you really have to study it for five and half years . Because it's really difficult to explain in mere few words .
    Ok we would go with your doubts
    About question 1, 2 I have already answered I suppose , and would forward you a video as well as soon as I get it .
    3. It's a myth that , Homoeopathy has answers only with poisonous substances , no . Basically every substance has got some of the properties . And it's not always about the latent states but also when at the extremes. Every drug I. Homoeopathy is well proven and methodically done considering each and every property of the substance .
    4. Thyroidium is a nosode , and it would surely act in thyroid disorders , if chosen homeopathically and not the way for direct effects . For this again you need to refer to the point a mentioned about vital force !
    5. Yes , that's what the proving is all about , and the new symptoms if we get in any particular drug that has to be tried and tested the empirical way and then added to encyclopaedia.
    6. there are books for lay man as well , but those are misused. Many people think it's easy to practice Homoeopathy just by reading a drug picture and matching it , which is surely not the case. About the placebo effects and other drug effects it is published in journals. And you are quite right , it should be publicly done , but for that the understanding of any subject is important, which I think comes only with the deep study
    7. After And along with Dr. Haneman there were lot other doctors who had their valuable inputs to this system , but if you know only about Dr. Bach , then it's good that no clarification needed , as stalwarts and their work is all mentioned in the literature of Homoeopathy.
    8. About camphor , I don't know who has told you this ! Nothing of that sort will hampere the effects of well chosen drug
    9. Homoeopath can and would surely commit a mistake , because it's a very difficult science to practice first of all. So no one can boast about it. And if the chosen drug is wrong , as it won't be similimun it won't act , but just prove its symptoms inside the body , the way drug proving a are done .
    10. About the allopathy and Homoeopathy, basically no pathy is against of any particular pathy. It's just the time that calls for any particular one. Now the holistic approach in which homoeopath and allopath are simultaneously treating a case eg. Cancers. It's a personal view of any doctor. But a doctor who thinks in a patients interest would never ask to leave any system which is actually benefiting the patient .
    If Homoeoapthy is taking over in due course of time like what happens with the cases of hypertension, thyroid disorders and mental illnesses , allopath themselves would advice and reduce their doses.
    I hope I have almost clarified your doubts . As I told you its difficult to explain homeopathy mere in a blog, and so is for the doubts !

    ReplyDelete
    Replies
    1. This answer is in good spirit & I welcome that. I am also for collaboration of pathys.
      Unless we assume a medium which is more subtle than electromagnetic field & form of information that can inscribed on it the main puzzle is not solved. Complexity of Homeopathy is not unknown to me I have assisted a practitioner for collecting & finding inter-section set by using Kent's repertory. Weightages to applied are a matter of intuitive judgement. Thanks-----------Rajeev

      Delete

  7. But really thanks for this one , where in we homoeopath get to know how important it is to reach up to people and make them understand !
    Having said that ,
    Would like to state a very important point here , no placebo would act on a new born kid or babies and same with the animals (pets or otherwise ) Homoeopathy is widely used in paediatric cases and for animals , with great results. So I think that basically explains all .
    It's really weird that in some countries ppl and doctors are madly learning Homoeopathy seeing and witnessing the results , and in some the questions are still being raised !!
    All that matters is the benefits and effects to patients , and that too safe and sound! And I think Homoeopathy is succeeding in that.
    If you have any doubts please feel free to contact me !
    I am a homoeopath , practicing Homoeopathy successfully and happily since past almost 11 years .
    Dr. Urjita kulkarni
    9822651290

    ReplyDelete
    Replies
    1. Yes babies & animals would not have placebo effect is quite logical. I wish you also a success in enlightening people on homeopathy. I would contact you if & when necessary.
      Thanks again------Rajeev.

      Delete
  8. placebo doesn't work in babies and animals, but it does seem to work on their parents and owners, respectively! Anyway, just anecdotal or subjective opinion that something 'works' is no good at all in a scientific pursuit like medicine, unless proved in double-blind clinical trials. Where is the incontrovertible scientific evidence (in peer-reviwed journals) that homeopathy works on babies and animals; let alone on human beings? And as regards there being a totally different 'vital force' that only homeopaths understand - this is beyond funny! How come there are no scientific articles in peer-reviewed journals about this nebulous "vital force"? Homeopaths do not seem to believe in the scientific method and are averse to critical thinking. They should stop fooling themselves and their hapless patients.

    ReplyDelete
  9. I have cough problem. I used take antibiotic pills to cure it.But I use to have weakness.
    Then I started to take homoeopathy treatment. It gave me very good result without weakness.
    Last 20 years I am getting very good result. I do not feel it as placebo effect.

    ReplyDelete