Wednesday, September 16, 2015

वादसभेचे यमनियम- भाग 2

(तांत्रिक कारणासाठी हा लेख दोन भागात केला आहे.)

४) व्याख्या करण्याची गरज का भासते? व्याख्या करणे अशक्य कधी ठरेल?  
   व्याख्येत दोष कोणते असतात?
प्रथम व्याख्येचीच व्याख्या केलेली बरी. जे विधान संज्ञेची व्याप्ती आखून देते ते विधान त्या संज्ञेची व्याख्या होय. संज्ञेच्या विषयाचे संपूर्ण वर्णन म्हणजे व्याख्या नव्हे. व्याख्या ही नेमके एवढेच वैशिष्ट्य सांगते, की जे असेल तर संज्ञा लागू होते, नसेल तर होत नाही.

गाईच्या व्याख्येमूळे कुठलीही गाय ही गाईच्या संकल्पनेतून वगळली जाता कामा नये कुठलीही म्हैस गाईंमध्ये शिरता कामा नये. काही प्रकारच्या गाई वगळल्या गेल्या तर अव्याप्तिदोष होतो. म्हशीही पकडल्या गेल्या तर अतिव्याप्तिदोष होतो. अर्थात गाय, घोडा, खुर्ची, खडू, फळा यांसारख्या मूर्त स्तुंच्या व्याख्या करण्याची सहसा गरज पडत नाही. जे बोट दाखवून दाखवता येते ते बोट दाखवूनच दाखवावे. मूर्त गोष्टींना व्यापणार्या अमृर्त गोष्टींच्या व्याख्या कराव्या लागतात.

रोजगार म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? सेंटिग्रेडम्हणजे काय? आम्ल म्हणजे काय? अशा अमृर्त गोष्टींच्या व्याख्या कराव्या लागतात. उदा. जे संयुग हायड्रोजनचा आयन देऊ करते ते आम्ल होय. पण जर व्याख्या अशी केली की, जे जे ऑक्सिडीकरण करते ते आम्ल होय, तर ही अतिव्याप्ती होईल. हायड्रोजन आयन हे आम्लाचे स्वरूप लक्षण होय. लिटमस लाल होणे तटस्थ लक्षण होय.

काही गोष्ट अमूर्त असूनही अव्याख्येय असतात. जसे काल. कालाची कोणतीही व्याख्या कालवाचक प्रश्नार्थक सर्वनामे कधी/केव्हा किंवा कालवाचक विशेषणे, अगोदर/नंतर, असे शब्द वारता करताच येत नाही. म्हणजे काल ही कोटी स्वतःलाच गृहीत धरते.

पण काल म्हणजे काय याविषयी सहसा कोणात वाद नसतो. कारण काल ही जरी बाह्य वस्तू म्हणून प्रत्यक्ष नसली तरी अंतर्दृष्टीला साक्षात आढळणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती कोटी व्याख्येशिवायच आपण सहज वापरू शकतो.

काही संकल्पना वादग्रस्तच राहणार्या असतात. त्यांची विशिष्ट वादप्रसंगापुरती कामचलाऊ व्याख्या करता येते, पण ती समाधानकारक किंवा सार्वत्रिक होत नाही. जसे प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं तुमचे आणि आमचं सेमच असते ही कविता म्हणून ठीक आहे  पण व्याख्या म्हणून सदोष आहे.

स्वाश्रय हा दोष इथे दिसतो. कुठलीही संज्ञा स्वतःच स्वतःची व्याख्या हो शकत नाही. याखेरीज अन्योन्याश्रय, चक्रकाश्रय, अनवस्था, स्वयंव्याघात असे अनेक दोष असतात. परंतु तो एक स्वतंत्र विषय आहे.

वादसभेत व्याख्या करणे ही एक अतिशय आवश्यक गोष्ट असते. कारण त्याशिवाय वर म्हटलेले सांज्ञिक मतभेद स्पष्ट होत नाहीत. तसेच तार्किक कसोट्या लावण्यासाठीसुद्धा ज्या संज्ञा वापरून विधाने करायची, त्या संज्ञा निर्णायकपणे आखलेल्या असाव्या लागतात. आम्लाची व्याख्या आपण वर पाहिली. हे द्रावण आम्ल आहे हे विधान आहे. कारण त्यात दोन भिन्न संज्ञाचा परस्परसंबंध (आम्लता हा गुण हे द्रावण हा गुणी) सांगितला आहे. हे द्रावण आम्ल आहे; लिटमस लाल झाला यावरून असे विधान केले की तो तर्क होतो.

जोपर्यंत व्याख्या चोख होत नाहीत तोपर्यंत विधाने तर्क निसरडे राहतात. निर्णायकपणे सिद्ध किंवा असिद्ध होणारी गुळगुळीत किंवा पसरट विधाने तात. चांगल्या वादसभेचे हे लक्षण नव्हे. अनेक तर्कांचे मिळून एखादे प्रतिपाद हे युक्तीवाद बनते.

५) एखादे प्रतिपादन चूक आहे. असे कधी म्हणता येते?
खरे तर न्यायशास्त्र हा मोठा विषयच या गोष्टीला वाहिलेला आहे. अनुमान हे प्रमाण (योग्य ज्ञानाचे साधन) कोणकोणत्या अटी पाळल्यास प्रमाण असते कोणकोणत्या स्थितीत ते सदोष म्हणून दिशाभूल करणारे असते हा या शास्त्राचा विषय आहे. त्याचे छोटेसे उत्तर देणे हे न्यायकारक ठरेल. डॉ. नलिनी चाफेकर यांनी अनुवाद विवेचन केलेला अन्नभट्ट यांचा तर्कसंग्रह हा छोटासा(!) ग्रंथ वाचणे हे माझ्या मते किमान आवश्यक आहे. विशेषतः भारतीय विचार परंपरा ही किती काटेकोर चोख आहे हे कळायला एकूणच वैचारिक शिस्त या गोष्टीची थोडीशी चुणूक मिळायला हे आवश्यक आहे.

६) वादसभेत पाळण्याची पथ्ये कोणती? वादसभेची कार्यपद्धती कशी असावी?
जे जे दोष आपण समोरच्या पक्षात असल्याचे दाखवतो, ते दोष आपल्या प्रतिपादनात नसण्याची आपल्यावर जबाबदारी येते. काही वेळा काही दोष हे अपरिहार्य असतात.

उदाहरणार्थ एकूण संज्ञांची संख्या सा(फाईनाइट) असल्याने कोठे तरी चक्रकाश्रय/अन्योन्याश्रय होतोच किंवा मानवी ज्ञानाच्याच काही मर्यादा असतात, यामुळे आपण काही दोष पत्करूनही पुढे जात असतो. जे दोष पत्करणे आपल्याला आवश्यक वाटते ते पत्करण्याची सवलत आपण समोरील पक्षालाही दिली पाहिजे. समाईक मान्यता किंवा सर्वमान्य गृहीतके ठरविताना काही वेळा खरे म्हणजे अमान्य आहे, पण आता वादापुरते धरून चालू असे करावे लागते; नाही तर वाद पुढेच जात नाही.

प्रथम जो पूर्वपक्ष खोडून काढायचा असेल त्याची ताथ्यिक, मौलिक, दार्शनिक मते तात्पुरती मान्य करूनही त्यांच्याच व्यूहा सांज्ञिक तार्किक घोटाळे कुठे आहेत, हे शोधावे. ही अंतर्गत टीका (इंटर्नल क्रिटिसिझम) झाली. त्यानुसार सुधारणा करून घेऊन प्रतिपक्षाचे सर्वोत्तम प्रतिपादनच वादासाठी घ्यावे. कच्चे प्रतिपादन कोलमडवणे नेहमीच सोपे असते, पण त्यामुळे ज्ञान पुढे जात नाही.


तसेच जे बिनमहत्त्वाचे मुद्दे असतील त्यांच्यावर अडकून राहणे फायद्याचे ठरते. तुम्हाला असेच म्हणायचे आहे ना? या अर्थाचे स्पष्टीकरणात्मक प्रश्न एकमेकांना आधी विचारण्यावर भर असावा. शुद्धलेखन, व्याकरण, दृष्टांतातले उपमानाखेरीजचे घटक, लकबी, शैली, यावर जास्त घसरू नये. तसेच संबधित नसलेल्या विषयात तत्सम शब्द आढळतो एवढ्याखातर शब्दच्छल करू नये.

No comments:

Post a Comment