Friday, May 29, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - 3

   
   १)    तू मला आवडतेस(किंवा आवडतोस) या वाक्यातला कर्ता कुठला आणि कर्म    
      कुठले?


२)    मराठीतील कर्तरी-कर्मणी आणि इंग्लिशमधील अक्टिव्ह पॅसिव्ह ही प्रकरणे एकच आहेत की वेगळीच आहेत? त्यातला फरक नेमका कोणता?

३)    साबण कोणत्याही रंगाचा असला तरी फेस पांढराच होतो. असे का?

४)    एकेका वर्तुळपाकळी(सेक्टर)वर सात रंग लावलेली चकती वेगाने फिरवली तर ती पांढरी दिसते. त्याच रंगांच्या लेपन-द्रवांचा(पेंट्स) काला केला तर तो मात्र जवळपास काळा होतो. असे का?

५)    सिझेरियनचा मुहूर्त साधून बालकाचे भविष्य घडवता येईल काय? 

No comments:

Post a Comment