१) सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो
त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?
२) प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड
मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?
३) सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर
का आणता येऊ नये?
४) ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास ती म्हण म्हणून का रुळली असेल?
याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता मुद्दा तर्कशास्त्रात येतो?
५) प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान
झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?
No comments:
Post a Comment