Thursday, February 4, 2016

रीझन आणि रॅशनॅलिटी यांचे मूल्यांच्या प्रांतातील स्थानखरेतर जबाबदारीने वागणे हीच गोष्ट ज्ञानक्षेत्रात आली की ज्ञानदावे प्रमाणित करून घेण्याची वृत्ती आणि क्षमता अंगी बाणवली जाते (कारण बीजरूपात या गोष्टी प्रत्येकात असतात). वृतीला रॅशनॅलिटी व क्षमतेला रीझन म्हटले जाते.

कारण आपल्या मताला ज्ञान समजून कोणी त्यापासून कार्यमंत्रणा (प्रिस्क्रिप्शन) घेईल व जर त्याचे आपल्यामुळे हुकले तर ते बरोबर नाही. हीच आस्था ज्ञानशास्त्रीय घटपटादि खटपटींच्या मागे असते.

प्रमाणे कोणती मानावीत आणि किमान दोन स्वतंत्र प्रमाणांनी कन्फर्म कसे करावे या तांत्रिक विषयात आता शिरायला नको.

पूर्वी एकटा ज्ञाता घेऊन रीझन व रॅशनलिटी वर मांडणी होत असे.

युर्गेन हाबेरमास यांनी व्यक्तीचे गुण म्हणून बघण्याच्या जागी संवादाचे गुण म्हणून प्रामाण्याच्या (व्हॅलिडेशनच्या) अटी सांगितल्या. त्यानुसार प्रमाण संवाद म्हणजे ज्यात दोन्ही संवादक व्यक्ती एकमेकींना पुढील गोष्टी देणे लागतात.

  • आपल्या म्हणण्यातील चिंतनगम्य भाग समोरच्याला आकलनीय करणे.
  • आपल्या म्हणण्यातील मूल्यदावे कसे सर्व मानवांसाठी उचित आहेत व एरवी तुम्हीही मानत असता हे दाखवून देणे.
  • आपल्या म्हणण्यातील तथ्यदावे पडताळण्याची व बाधित करता येण्याची संधी राखणे.
  • आपण जर पुष्टीदायक पूर्वंमते/पूर्वकथिते घेत असू तर त्याचा स्रोत सांगणे.
  • आपला संवादामागील हेतू खेळियाचा/चालकाचा नसून सच्चा आहे याचा प्रत्यय देणे.   

1 comment:

  1. काय अॅप्ट मांडणी आहे. धन्यवाद.

    ReplyDelete