Showing posts with label मर्मजिज्ञासा. Show all posts
Showing posts with label मर्मजिज्ञासा. Show all posts

Friday, July 24, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच -१० उत्तरे

१) पुढील शब्दांचा नेमका अर्थ काय?(जसा नोकर-चाकर पैकी चाकर म्हणजे पडेल ते घरगुती काम करणारा)
--रजवाडे, ---उमराव --दरकदार, --चोपदार, --किन्नर, , ---जुमला, ---नारू, ----देवस्की, ---अर्चा, ---पुस्त, ---मरातब, ------इतबारे, ----कज्जे, ---काज

एतबार म्हणजे विश्वास किंवा विश्वासार्हता म्हणून इमाने-इतबारे म्हणजे प्रामाणिकपणे आणि विश्वासार्हतेने. काज हा कार्य चा अपभ्रंश असून बंगालीत कामाला काजच म्हणतात. अर्चा म्हणजेच पूजा म्हणून पूजाअर्चा ही द्विरुक्ती आहे. बाकी यक्ष आणि किन्नर यात नेमका काय फरक असतो वगैरे मलाही नक्की माहीत नाही. तसेच उमराव दरकदार चोपदार यांचे सुध्दा   
जारण-मारण मधील जारण म्हणजे काय?
वशीकरण म्हणजे काम-मोहात पाडणे (टु सेड्यूस) यार चा अपभ्रंश जार म्हणजे विवाहबाह्य प्रियकर म्हणून जारण म्हणजे वशीकरण  

२) ‘लागणे’ या क्रियापदाला मराठीत एकूण किती अर्थ आहेत.
[सूचना: बंदराला बोट लागली हे एकदा मोजले की फलाटाला गाडी लागली हे वेगळे मोजता येणार नाही. झाडाला आंबे लागले म्हटल्यावर वेलीला घोसावळी हे चालणार नाही, इत्यादी]

सूचनेत दोन उत्तरे आलेली आहेतच त्या शिवाय-----
सुपारी लागणे म्हणजे तोठरा बसणे किंवा सुपारी हवीशी वाटणे. फार लागलं नाही ना? मनाला लागलं यात पासून त्रास होणे: हा अर्थ येतो.
सातत्य: हा अर्थ ‘पाऊस लागला आहे’.
तहान भूक उत्सर्जनाचे वेग यांचे क्रियापद लागणे हेच येते
संपर्क किंवा स्पर्श,
सुरुवात होणे ‘तेव्हा पासून तो हा व्यवसाय करू लागला’.
काहीतरी चिकटलेले असणे.
उलगडा म्हणजे अर्थ लागणे (कळणे).
वाईट निघणे: आंब्याची पेटी खराब लागली.
आड येणे: खणताना दगड लागला, लाकडात गाठ लागली.
सक्ती होणे: “हे करावंच लागेल” लागण होणे, लागवड करणे अशी मॉडिफाइड रूपेही अनेक आहेत.
‘लागणे’चे एकूण अर्थ हा एक प्रोजेक्टच होईल
    
३) स्वर्गाला अमूत्र असे का म्हणतात
      स्वर्गातील जीवांचे अन्न व पचन असेच असते की मल मूत्र हा प्रश्नच येत नाही अशी कल्पना असल्याने शब्दशः अमूत्र असेच म्हणतात इहामूत्रफलभोगविराग म्हणजे येथील वा स्वर्गातील सुखभोगात कोणताही रस न उरणे ही (वैराग्य येणे) केवलाद्वैत वाचण्यासाठी पूर्वअट आहे. नित्यानित्यवस्तूविवेक, शमदमादिसंपत्तीषटक आणि मुमुक्षुता या साऱ्या अटी आहेत. हे दुर्लक्षून कोणीही वाचन करतात वाद घालतात व साधनाही करतात.  

४) सालंकृत-कन्यादान, अल्पोपहार (की अल्पोपाहार), सुस्वागतम्
यांत द्विरुक्ती टाळल्यास काय म्हणता येईल?
अलंकृत किंवा सालंकार, उपाहार किंवा अल्पाहार, स्वागतम् मध्येच सु आगत आलेले आहे त्याला आणखी एक सु लावण्याची गरज नाही.

५) दीनानाथ हा समास दीनांचा नाथ असा सोडवला तर संधी कसा सुटेल?
  दीनांचा नाथ हे दीननाथ होईल दीनानाथ केले तर संधी दीन+अनाथ असा   
  सुटेल व समास दीन आणि अनाथ असा म्हणजेच द्वंद्व ठरेल.

६) लोहचुंबक हा शब्द लोहाकर्षक असा केल्यास काय फायदा होईल?
   कर्ष महत्त्वाचा दर वेळी चुंबन होण्याची गरज नाही.
७) समास सोडवा: कंठस्नान, माकडहाड, पुण्यश्लोक, पुण्यतिथी, राजर्षी, गंगावन, लोटांगण, शस्त्रसंधी,
कंठातून उडणाऱ्या रक्ताने स्नान,

राजर्षी (उदा शाहू महाराज) म्हणजे ऋषींचा राजाही नव्हे व राजाच्या पदरी असलेला ऋषीही नव्हे.  ऋषितुल्य असा राजा असा अर्थ होतो. यात पहिले पद हे उद्देश्यपद आहे दुसरे नव्हे यामुळे हा तत्पुरुष होत नाही पण अव्ययीभावही होत नाही म्हणजेच उपलब्ध वर्गीकरणात राजर्षी बसत नाही.

गंगा आणि वन यांचा काहीही संबंध लागत नाही गंगातीरी वेणीदान करण्याशी केस मिळण्याचा संबंध असू शकेल.
तसेच लोटा आणि अंगण नसून अंग लोटून देणे हा अर्थ आहे. उपलब्ध वर्गीकरण अपुरे आहे हे उघड आहे.   
  
८) काही सरकलेले अर्थ(मूळ अर्थ किंवा उचित प्रतिशब्द सांगा)
  अनभिषिक्त म्हणजे अनाव्हानित नव्हे तर—अधिकृतता न मिळालेला
  विहंगम म्हणजे रमणीय नव्हे तर ----पक्ष्याने वरून पाहिलेले (प्लॅन किंवा
                                                    गुगलमॅप)

  निरलस म्हणजे निस्वार्थी नव्हे तर----आळस न करणारा
  आरती म्हणजे स्तवन नव्हे तर-    आर्त पुकार पण प्रत्यक्षात स्तवनेच
                                               असतात
 प्रच्छन्न म्हणजे उघड उघड नव्हे----उलट छुपे आच्छादन मधला च्छ पहा
  उच्छृंखल म्हणजे चंचल नव्हे तर--- साखळ्यांमधून मुक्त  
  निस्पृह म्हणजे कठोर नव्हे तर---- निरिच्छ
  उदासीन म्हणजे विमनस्क नव्हे तर----उत् आसीन म्हणजे वर बसलेला  
  अपरोक्ष म्हणजे दृष्टीआड/अनुपस्थितीत नव्हे तर---उलट समक्ष जेव्हा  
  आपण अपरोक्ष म्हणतो तेव्हा खरे तर आपल्याला परोक्ष म्हणायचे असते   
 




Friday, July 17, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच -९ उत्तरे

१)    तिथ्यांशी निगडीत असलेल्या रूढीना ऋतुमानावर आधारित कारणे दिली जातात. अधिक महिना मानून सौर-चांद्र चक्रे बसती करण्याने ही कारणे खोटी पडत नाहीत काय?

२)    जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सवर एकच एक बदलत्या खोलीचा वण पाडलेला असे आणि त्याच्यानुसार होणारी पिनची थरथर ध्वनीत रुपांतरीत केली जाई. (फिल्मवरही काळ्यावर पांढऱ्या, बदलत्या जाडीच्या, एकाच रेषेने साउंडट्रॅक नोंदलेला असे.) प्रश्न असा की अनेक आवाज, वाद्यवृंद, गाण्याचे वा बोलण्याचे, वेगवेगळ्या पट्टी व पॅटर्नचे, एकसमयावच्छेदेकरून (सिंक्रोनाइज्ड) निर्माण करण्यात हा एकच एक आलेख कसा यशस्वी होई?


३)    वर्तुळात विभिन्न त्रिज्या वापरून निर्माण होणारी क्षेत्रफळे ही बाहेरच्या बाजूला जास्त जागा मावणारी व आतल्या बाजूला कमी जागा मावणारी अशीच असणार. असे असूनही अनेक समान कालावधीची गाणी असलेल्या रेकोर्डवर त्या त्या गाण्यांची त्रिज्या-अंतरे समान कशी काय दिसतात?

४)    छिद्रातून गळून जात असलेल्या पाण्यात जो भोवरा तयार होते तो उत्तर गोलार्धात एका दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट दिशेने होतो. [क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईजपैकी (सव्य-अपसव्य पैकी)] असे कां व्हावे? विषुववृत्ताच्या अगदी जवळ सुध्दा हेच घडते ते कां? किंबहुना हा एक टूरिस्ट स्पॉट आहे.

५)    रंगीत टीव्ही वर प्रकाशित होणारा बिंदू तीन बिंदूनी बनतो. एक लाल, एक निळा व एक हिरवा असे सांगितले जाते हे जर खरे असेल तर पिवळा दिसण्यासाठी हिरव्यातून निळा वजा कसा घालतात?





उत्तरे
१) तिथ्यांशी निगडीत असलेल्या रूढीना ऋतुमानावर आधारित कारणे दिली जातात. अधिक महिना मानून सौर-चांद्र चक्रे बसती करण्याने ही कारणे खोटी पडत नाहीत काय?
   उत्तर-होय खोटी पडतात. अधिक महिना ही चुकीचीच पद्धत आहे.

२)      जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सवर एकच एक बदलत्या खोलीचा वण पाडलेला असे आणि त्याच्या नुसार होणारी पिनची थरथर ध्वनीत रुपांतरीत केली जाई. (फिल्मवरही काळ्यावर पांढऱ्या, बदलत्या जाडीच्या, एकाच रेषेने साउंडट्रॅक नोंदलेला असे.) प्रश्न असा की अनेक आवाज, वाद्यवृंद, गाण्याचे वा बोलण्याचे, वेगवेगळ्या पट्टी व पॅटर्नचे, एकसमयावच्छेदेकरून(सिंक्रोनाइज्ड) निर्माण करण्यात हा एकच एक आलेख कसा यशस्वी होई?
उत्तर-हा आलेख एकाच ध्वनीचे प्रतिनिधित्व करत नसे अतिशय वेडावाकडा वक्र असला की त्यातून अनेक कंप्रतांचा पट तयार होतो फोरियरच्या नियमानुसार हे फक्त गणितात नव्हे तर प्रत्यक्षात घडते. कोरला जात असताना सर्व ध्वनींच्या त्या त्या कंप्रतांच्या अनेक उपकंप्रतांच्या क्षणिक मूल्याची परिणामी बेरीज होईल अशाच बेताने आलेख कोरला जाई.

३)      वर्तुळात विभिन्न त्रिज्या वापरून निर्माण होणारी क्षेत्रफळे ही बाहेरच्या बाजूला जास्त जागा मावणारी व आतल्या बाजूला कमी जागा मावणारी अशीच असणार. असे असूनही अनेक समान कालावधीची गाणी असलेल्या रेकोर्डवर त्या त्या गाण्यांची त्रिज्या-अंतरे समान कशी काय दिसतात?

   उत्तर-रेकोर्डवरील आलेखाची घनता बदलतेच पण नेमका तितकाच बदल रेकोर्डिंग करते वेळीही घडत असल्याने, वेगवेगळ्या रेषीय गती असूनही कोन-गतीच परिणाम कारक ठरते

४)      छिद्रातून गळून जात असलेल्या पाण्यात जो भोवरा तयार होते तो उत्तर गोलार्धात एका दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट दिशेने होतो. [क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईजपैकी (सव्य-अपसव्य पैकी)] असे कां व्हावे? विषुववृत्ताच्या अगदी जवळ सुध्दा हेच घडते ते कां? किंबहुना हा एक टूरिस्ट स्पॉट आहे.
   उत्तर- पाणी सुध्दा पृथ्वीबरोबर फिरतच असते. त्याच्यातही गतीशील जडत्व बले कार्यरत असतात. कोनीय गती (अँग्युलर व्हेलॉसिटी) एकच असली तरी रेषीय गती ही जितका मोठ्या त्रिज्येचा अक्षांश तितकी जास्त असते व लहान त्रिज्येच्या अक्षांशाला कमी असते. (ध्रुवावर उभे राहिलो तर स्वतःभोवती आपोआप फिरून मूळ दिशेला यायला आपल्याला आख्खा दिवस लागेल!) म्हणून पाण्याच्या रेणूंची रेषीय गती ही विषुववृत्ताच्या बाजूला असणाऱ्या रेणूना जास्त आणि धृवाकडील बाजूला असणाऱ्या रेणूना कमी असते. हा फरक एरवी नगण्य असला तरी भोवरा बनताना मिळालेली किंचितशी टॉर्क(वलनबल) निश्चितपणे सव्य वा अपसव्य असते. म्हणून गोलार्धानिहाय हे ‘सव्यापसव्य’ प्रकरण घडते. पाण्याची दक्षिणोत्तर रुंदी अशी कितीशी असणार? हे खरेच आहे पण तेवढा फरक सुध्दा पुरतो असे दिसतेय.

५)      रंगीत टीव्ही वर प्रकाशित होणारा बिंदू तीन बिंदूनी बनतो. एक लाल, एक निळा व एक हिरवा असे सांगितले जाते हे जर खरे असेल तर पिवळा दिसण्यासाठी हिरव्यातून निळा वजा कसा घालतात?

   उत्तर- याचे उत्तर मला समाधानकारक असे मिळालेले नाहीये. माझे  मत लाल पिवळा आणि निळा हेच मूळ रंग आहेत असे आहे. चित्रकार त्याच्या पासून हव्या त्या छटा बनवू शकतात.   














मर्मजिज्ञासा प्रश्नसंच -१०

१) पुढील शब्दांचा नेमका अर्थ काय?(जसा नोकर-चाकर पैकी चाकर म्हणजे  
   पडेल ते घरगुती काम करणारा)
   --रजवाडे, ---उमराव --दरकदार, --चोपदार, --किन्नर, , ---जुमला, ---नारू,  
   ----देवस्की, ---अर्चा, ---पुस्त, ---मरातब, ------इतबारे, ----कज्जे, ---काज   
  जारण-मारण मधील जारण म्हणजे काय?

२) ‘लागणे’ या क्रियापदाला मराठीत एकूण किती अर्थ आहेत.
   [सूचना: बंदराला बोट लागली हे एकदा मोजले की फलाटाला गाडी लागली   
    हे वेगळे मोजता येणार नाही. झाडाला आंबे लागले म्हटल्यावर वेलीला  
    घोसावळी हे चालणार नाही, इत्यादी]

३) स्वर्गाला अमूत्र असे का म्हणतात

४) सालंकृत-कन्यादान, अल्पोपहार (की अल्पोपाहार), सुस्वागतम्
  यांत द्विरुक्ती टाळल्यास काय म्हणता येईल?

५) दीनानाथ हा समास दीनांचा नाथ असा सोडवला तर संधी कसा सुटेल?

६) लोहचुंबक हा शब्द लोहाकर्षक असा केल्यास काय फायदा होईल?

७) समास सोडवा: कंठस्नान, माकडहाड, पुण्यश्लोक, पुण्यतिथी, राजर्षी,  
   गंगावन, लोटांगण,

८) काही सरकलेले अर्थ(मूळ अर्थ किंवा उचित प्रतिशब्द सांगा)
   अनभिषिक्त म्हणजे अनाव्हानित नव्हे तर--
   विहंगम म्हणजे रमणीय नव्हे तर ----
   निरलस म्हणजे निस्वार्थी नव्हे तर----
   आरती म्हणजे स्तवन नव्हे तर---
   प्रच्छन्न म्हणजे उघड उघड नव्हे----
   उच्छृंखल म्हणजे चंचल नव्हे तर---
   निस्पृह म्हणजे कठोर नव्हे तर----
   उदासीन म्हणजे विमनस्क नव्हे तर----
   अपरोक्ष म्हणजे दृष्टीआड/अनुपस्थितीत नव्हे तर---
 




Friday, July 10, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ८ उत्तरे



१)    सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?

२)    प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?

३)    सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर का आणता येऊ नये?

४)    ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास ती म्हण म्हणून का रुळली असेल? याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता मुद्दा तर्कशास्त्रात येतो?

५)    प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?








 उत्तरे

१)    सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?

उत्तर-सत्वगुणाच्या व्याख्येनुसार त्यात संताप ही गोष्ट बसूच शकत नाही. म्हणजेच सात्विक-संताप हा वदतोव्याघातच आहे. जेव्हा आपल्या आलेला क्रोध हा आपल्या वैयक्तिक नुकसानामुळे किंवा कोंडीमुळे असतो तेव्हा आपण त्याला सात्विक म्हणत नाही. ज्या घटनेमुळे किंवा कृतीमुळे आपण मानत असलेले ब्रीद मोडले जाते, धोक्यात येते आव्हानित होते तेव्हा येणारा संताप हा खासगी नसतो.

ब्रैदिक हा शब्द कसासाच वाटेल म्हणून नैष्ठिक-संताप असा शब्द प्रचारात आणता येईल. पण नैष्ठिक संतापही राजसच असेल सात्विक नव्हे.  

२)    प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?

उत्तर-यात दोन दोष आहेत. एकतर दोन नकारात्मक विधानांवरून एक सकारात्मक विधान निगमित करता येत नाही असा नियम आहे. दुसरे असे की प्लास्टिकचे मोती हे कृत्रिम मध्ये मोडतात पण सर्वच कृत्रिम मोती हे प्लास्टिकच्या मोत्यात मोडतात असे आधार विधान नाही. किंबहुना कल्चर्ड मुळे कृत्रिमतेला प्लास्टिकेतर वर्ग असतात हेच दिसून येते.

याला अन-डिस्ट्रिब्यूटेड मिडल असे म्हणतात व न्यायात सत्प्रतिपक्ष, व्यभिचारी हेतू असे हेत्वाभास सांगितलेले आहेत. कल्चर्ड मोती असावेत की नसावेत किंवा कल्चर्ड मोत्यांना कृत्रिम म्हणावे की म्हणू नये हे प्रश्न तर्कदोषात येत नाहीत. ते आधार विधानाला आव्हानित करणारे व्याखेचे प्रश्न आहेत. 
   
३)    सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर का आणता येऊ नये?

उत्तर-सायफनचा स्रोतबिंदू आणि जेथे द्रव पोहोचते तो लक्ष्यबिंदू यांच्यात वरून खाली अशीच दिशा असते. खालून वर पेक्षा वरून खाली हा भाग जास्त असला तरच सायफन होते. मधल्या भागात जरी पाणी वरच्या दिशेने गेले तरी ते अंतिमतः वरून खालीच जातच नसते. सायफनमुळे मधला अडसर बायपास करता येतो पण विभवांतर (पोटेन्शियल डिफरन्स) किंवा ‘हेड’ उत्पन्न करता येत नाही. हवेच्या दाबामुळे सायफन शक्य होते पण हवेच्या दाबावर ते चालू रहात नाही त्यासाठी हेडच लागते.

४)    ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास ती म्हण म्हणून का रुळली असेल? याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता मुद्दा तर्कशास्त्रात येतो?

उत्तर-अपवादाने नियम बाधितच होतो सिद्ध नव्हे. नियम जर ढोबळ आडाखाच असेल तर त्याला अपवादही असतात पण ते असण्याने नियम सिद्ध होण्याचे काहीच कारण नाही.

युक्तिवादात अडचण आल्यावर पळवाट म्हणूनच ही म्हण रुजली असावी. जे क्ष असेल ते य ही असतेच असा विधानाचा (येथे नियम म्हणजे विधिनियम नव्हेत तर गतिनियम) आकार ध्यानात घेतला तर ते जे क्ष नाही ते य नाही असेही दाखवता आले पाहिजे. म्हणजेच क्ष ला काहीतरी तद्-इतर शिल्लक पाहिजे “जे जे अस्तित्वात असते ते” अशा प्रकारे सर्वसमावेशक पक्ष (ज्याविषयी सिद्ध करायचे त्याला पक्ष म्हणतात) घेतल्यास प्रतिपक्षात बाध होतो हा पडताळा घेण्याची सोय उरत नाही. कोणत्या अटी पूर्ण केल्यास नियम बाधित होईल हे सांगता आले पाहिजे. म्हणजे तो नियम तपासणीय राहतो.  

५)    प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?

उत्तर-चातकपक्षी थेट पावसाचेच पाणी पितो असे मिथक आहे. ओंजळ, भांडे वगैरे काही नसले तर जलधारेत तुम्ही आडवे आलात आणि तोंड घातलेत तर पाणी मिळेल जलधारेच्या बाजूला / बाहेर राहून नव्हे. तद्वतच जेव्हा आपण प्रकाश किरणाच्या अक्षीय दिशेला आपल्या दृकपटलाने आडवे जातो तेव्हा त्या किरणाच्या द्वारे आपल्याला त्याचा स्रोत दृश्यमान होतो. किरण बाजूने पाहिला असता तो दृश्यमान नसतो. 

जर धूळ किंवा कसलेही कण नाहीत अशी पोकळ पारदर्शक नळी केली व तिच्यात झोत सोडला तर झोत जेथे पडेल तो कवडसा दिसेल, पण झोत दिसणार नाही. स्रोत दृश्यमान होतो असे म्हणताना आपण प्राथमिक स्रोत ज्योत, सूर्य, तापलेले फिलॅमेंट अशा गोष्टींबरोबर परावर्तक स्रोतही ध्यानात घेत आहोत. हे स्रोत अगदी लहान आकाराचे व बहुदिशाना प्रकाश परावर्तीत करणारे असू शकतात. 

थेट उन असेल तेथेच पृष्ठ प्रकाशित होईल व नसेल तेथे काळीठिक्कर सावलीच असेल असे कधीच होत नाही. प्रकाश हा थेट नसून विकीरीत झालेला डिफ्यूज्ड असाच आपण जास्त करून अनुभवतो. त्यामुळे दृश्यमान होते ती आभा होय. वातावरण आहे म्हणून आभाळ आहे. चंद्रावर तेथील दिवसाच्या बाजूलाही आकाश काळेच दिसते कारण वातावरण नाही.   



मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ९


१)    तिथ्यांशी निगडीत असलेल्या रूढीना ऋतुमानावर आधारित कारणे दिली जातात. अधिक महिना मानून सौर-चांद्र चक्रे बसती करण्याने ही कारणे खोटी पडत नाहीत काय?

२)    जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सवर एकच एक बदलत्या खोलीचा वण पाडलेला असे आणि त्याच्यानुसार होणारी पिनची थरथर ध्वनीत रुपांतरीत केली जाई. (फिल्मवरही काळ्यावर पांढऱ्या, बदलत्या जाडीच्या, एकाच रेषेने साउंडट्रॅक नोंदलेला असे.) प्रश्न असा की अनेक आवाज, वाद्यवृंद, गाण्याचे वा बोलण्याचे, वेगवेगळ्या पट्टी व पॅटर्नचे, एकसमयावच्छेदेकरून (सिंक्रोनाइज्ड) निर्माण करण्यात हा एकच एक आलेख कसा यशस्वी होई?

३)    वर्तुळात विभिन्न त्रिज्या वापरून निर्माण होणारी क्षेत्रफळे ही बाहेरच्या बाजूला जास्त जागा मावणारी व आतल्या बाजूला कमी जागा मावणारी अशीच असणार. असे असूनही अनेक समान कालावधीची गाणी असलेल्या रेकोर्डवर त्या त्या गाण्यांची त्रिज्या-अंतरे समान कशी काय दिसतात?

४)    छिद्रातून गळून जात असलेल्या पाण्यात जो भोवरा तयार होते तो उत्तर गोलार्धात एका दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट दिशेने होतो. [क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईजपैकी (सव्य-अपसव्य पैकी)] असे कां व्हावे? विषुववृत्ताच्या अगदी जवळ सुध्दा हेच घडते ते कां? किंबहुना हा एक टूरिस्ट स्पॉट आहे.


५)    रंगीत टीव्ही वर प्रकाशित होणारा बिंदू तीन बिंदूनी बनतो. एक लाल, एक निळा व एक हिरवा असे सांगितले जाते हे जर खरे असेल तर पिवळा दिसण्यासाठी हिरव्यातून निळा वजा कसा घालतात?

Friday, July 3, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ८


१)    सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?

२)    प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?

३)    सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर का आणता येऊ नये?

४)    ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास ती म्हण म्हणून का रुळली असेल? याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता मुद्दा तर्कशास्त्रात येतो?

५)    प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?



मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ७ उत्तरे

प्रश्न
१)    नत्रवायूचे श्वसनसंस्थेतील महत्त्वाचे कार्य कोणते?

२)    मनुष्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याबाबत केलेला सर्वात मोठा अपराध असूनही ज्या अपराधाविषयी पर्यावरणवादी चकार शब्दही काढत नाहीत तो अपराध कोणता?

३)    आपण एखादी वस्तू ढकलू पहात असलो(सोपेपणासाठी घर्षण दुर्लक्षित ठेवा) तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपण जेव्हढे बल लावू तितकेच विरुध्द बल निर्माण होईल ही दोन्ही बले एकमेकाला कॅन्सल आउट करतील मग वस्तू हलेलच कशी?
  

४)    एक अधोर्ध्व रेषा (व्हर्टिकल लाईन) आणि एक क्षितिजप्रतलीय रेषा (हॉरीझाँटल लाईन) या एकमेकींना समांतर आहेत! हे कसे?

५)    ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ चा अर्थ असा घेतला जातो की जे सत्य असते
तेच शिव(श्रेय) आणि सुंदरही असते. हे खरे आहे काय? किंवा ‘तसे असायला हवे’ असे मानणे योग्य आहे काय?











उत्तरे 


१)      नत्रवायूचे श्वसनसंस्थेतील महत्त्वाचे कार्य कोणते?

प्राणवायू पुरेसा विरळ म्हणजेच डायल्यूट ठेवणे आवश्यक असते इथे नत्रवायूचा अंगभूत गुणधर्म कार्यरत नसून सहभागी गुणधर्म (पार्टीसिपेटिव्ह प्रॉपर्टी) लक्षात घेतली आहे. दुसरे असे की नत्रवायू हा हिमोग्लोबिनला लॅच होत नाही. कार्बनमोनॉक्साइड हा हिमोग्लोबिनला नुसता चिकटत नाही तर एकेका रेणूला कायमचे निकामी करून सोडतो. 

२)  मनुष्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याबाबत केलेला सर्वात मोठा अपराध असूनही ज्या अपराधाविषयी पर्यावरणवादी चकार शब्दही काढत नाहीत तो अपराध कोणता?

निसर्गात विविध प्रजाती एकमेकींच्या लोकसंख्या नियंत्रणात ठेवतात. त्यांच्यात तसे संतुलन निर्माण झालेले असते. माणसाच्या तांत्रिक प्रगतीमुळे त्याला कोणी भक्षकच उरला नाही. सर्व भौगोलिक परिस्थितीत तो तगू शकतो. औषधक्षेत्रातील प्रगतीमुळे आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणून व इतर आरोग्य-सुधारणांमुळे त्याचे आयुर्मान वाढले. परंतु जनसंख्या नियंत्रणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून उदाहरणार्थ गोडे पाणी पुरणार नाही अशा घातक पातळीवर जनसंख्या पोहोचत आहे. पर्यावरणवादी हे कधीच जनसंख्येचा प्रश्न हा पर्यावरणाचा मुख्य प्रश्न आहे हे मान्य करीत नाहीत

३)  आपण एखादी वस्तू ढकलू पहात असलो(सोपेपणासाठी घर्षण दुर्लक्षित ठेवा) तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपण जेव्हढे बल लावू तितकेच विरुध्द बल निर्माण होईल ही दोन्ही बले एकमेकाला कॅन्सल आउट करतील मग वस्तू हलेलच कशी?
‘अक्शन हज गॉट इक्वल अंड अपोझिट रिअक्शन’ हे तिसऱ्या नियमाचे चुकीचे शब्दांकन आहे. मूळ नियम असा की जर अ या वस्तूने ब या वस्तूवर बल लावले तर ब ही वस्तू अ या वस्तूवर तितकेच बल विरुध्द दिशेने लावते. वरील प्रश्नातील ‘कॅन्सल आउट करतील’ हे विधान तेव्हाच खरे असते की जेव्हा दोन्ही बले एकाच वस्तूवर लागलेली असते. ढकलणारे आपण रिअक्शन झेलत असतो तर ढकलावायची वस्तू ही अक्शन झेलत असते. वस्तूची फ्री बॉडी डायग्रॅम काढली तर तिच्यावर एकच बल लागलेले असेल त्यामुळे ती हलण्यास काहीच प्रत्यवाय नाही.  

४)  एक अधोर्ध्व रेषा (व्हर्टिकल लाईन) आणि एक क्षितिजप्रतलीय रेषा (हॉरीझाँटल लाईन) या एकमेकींना समांतर आहेत! हे कसे?

पृथ्वीची कोणतीही त्रिज्या ही अधोर्ध्व असेलच. या त्रिज्येला काटकोनात (एक वर्तुळभर) त्रिज्या मिळतीलच. एखादी काटकोनातील त्रिज्या जेथे पृष्ठाला मिळते तेथे मूळ त्रिज्येला समांतर अशी स्पर्शिका काढता येईल. कोणतीही स्पर्शिका ही क्षितिजप्रतलीय असेलच. उदाहरणार्थ जर विषुववृत्तावरील कोणत्याही बिंदूतून दक्षिणोत्तर स्पर्शिका काढली (ही क्षितिजप्रतलीय असेलच) तर पृथ्वीचा अक्ष दक्षिणोत्तर असतोच व अक्ष ही रेषा (ध्रुवांतून निघणारी) अधोर्ध्व रेषाच आहे. सामान्यतः आपण बरेच व्यवहार  पृथ्वी सपाट धरूनच करतो. तसे पाहिले तर वळंबे हे समांतर नसून पृथ्वीच्या मध्याकडे एकवटत जाणाऱ्या त्रिज्या असतात!

५)  ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ चा अर्थ असा घेतला जातो की जे सत्य असते तेच शिव(श्रेय) आणि सुंदरही असते. हे खरे आहे काय? किंवा ‘तसे असायला हवे’ असे मानणे योग्य आहे काय?

‘तथ्य’ म्हणजे फॅक्ट. तथ्य-दावा हा खरा किंवा खोटा असू शकतो. ‘छद्म’ ‘दंभ’ ‘छल’ खोटे बोलणे/वागणे हे कुणालातरी फसविणे असते व म्हणून अन्यायकारक आणि वर्ज्य असते. मनापसून नाही ते ‘कृतक’ होय. ‘सत्याची बाजू’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला ‘न्याय्य बाजू’ असेच खरेतर म्हणायचे असते. माणसातील सरळपणा म्हणजे ‘ऋजुता’ (कोमलपणा नव्हे). ज्ञानाची वैधता म्हणजे ‘प्रामाण्य’. तसेच अस्तित्वाबाबत स्वावलंबी म्हणजे ‘सत्’. तसेच जे आपल्या इच्छे-अनिच्छेवर अवलंबून नसते व स्वीकारावे लागते ते ‘वास्तव’ होय  या सगळ्या भिन्न गोष्टींसाठी सत्य हा एकच शब्द वापरण्याने बरेच घोटाळे होतात. न्यायाचा विजय होवो असे म्हणता येईल पण ‘सत्याचा विजय होतोच’ हे शिस्तीला धरूनही नाही आणि प्रत्यक्षात खरेही नाही. माझे मत असे आहे की ‘सत्य’ सारख्या सबगोलंकारी संज्ञांचा वापर टाळून नेमके तथ्य, प्रामाण्य, सत्, ऋजुता, प्रामाणिकपणा वगैरे शब्द योजले जावेत.

शिव म्हणजे शंकर हा विशिष्ट देव नव्हे तर शुभ, मंगल, पवित्र वगैरे. माझ्यामते श्रेय (प्रिय च्या संदर्भात) हा जास्त नेमका शब्द आहे. 

सौंदर्य म्हणजे फक्त रोचकता नव्हे. रोचकता हवीच पण सौंदर्य हे आपल्याला एका वेगळ्या मनोवस्थेत नेते. त्यात डौल, प्रमाणबद्धता, रसरशीतपणा असे वेगळे घटक येतात. सौदर्याची व्याख्या करणे हा तत्त्ववेत्त्यांनी जिथे ‘हात टेकले’ असा विषय आहे.
हे सर्व लक्षात घेता, सत्य म्हणजेच शिव व शिव म्हणजेच सुंदर हे समीकरण चक्क खोटे आहे. ते तीन वेगळेच आयाम आहेत. 

कारागिरांचे हात तोडले(हे तथ्य असेल तर) ताजमहाल अश्रेय ठरतो पण असुंदर ठरत नाही. कर्तव्यनिष्ठेतील धन्यता हा सौंदर्यानुभव खचितच नसतो. एखादे मिथक अत्यंत श्रेयपूर्ण असू शकते. 

तेव्हा सत्य-शिव-सुंदर हे एकच नाही आणि एकच असण्याची गरजही नाही.