Tuesday, March 15, 2016

फॉलिबिलिझम आणि रिलेटिव्हिझम

फॉलिबिलिझम (त्रुटितज्ञानवाद) आणि रिलेटिव्हिझम (प्रामाण्य-सापेक्षतावाद) यातील फरक
कार्ल पॉपरने मानवी ज्ञान हे अ-दुरूस्तणीय(इनकॉरिजिबल) नसते तर त्यात नेहमीच दुरुस्तीला वाव असतो असे मांडले. इतकेच नव्हे तर जे विधान बाधित होऊ शकते पण अद्याप बाधित झालेले नाही असेच विधान वैध मानण्याचा आग्रह धरला.
जसा पडताळा कसा येणार हे सांगितले पाहिजे तसाच खोडताळा म्हणजे काय आढळल्यास खोटे ठरेल हेही सांगण्याची जबाबदारी त्याने मानली.

खुल्या समाजाचे शत्रू (प्लेटो, हेगेल व मार्क्स) या पुस्तकात सिद्धांतापेक्षा वेगळे निघाल्यास आभासी मानावे या वृत्तीचा त्याने धिक्कार केला.
अनेक वर्षांनतर जेव्हा त्याला असे लक्षात आले की त्याच्या म्हणण्याचा गैरवापर प्रामाण्य(व्हॅलिडिटी) व्यक्ती/गट/प्रसंग सापेक्ष असते असे मानणारे रिलेटिविस्ट करताहेत तेव्हा त्याने नवी प्रस्तावना जोडून त्याचे म्हणणे स्पष्ट केले.

जेव्हा न्यूटन |कमी| पडतो तेव्हा प्लँक किंवा आईनस्टाईनची |भर| पडते न्यूटनच्या खांद्यावर उभे रहाताना आम्ही त्याला आडवा पाडत नाही. आजही अतिसूक्ष्म किंवा अतिविराट परिमाणे नसतील तर न्यूटनचे नियम वापरूनच काम चालते व ते यशस्वीरीत्या चालते. म्हणजे मानवी ज्ञान दुरुस्त होते जाते तेव्हा ते सत्याच्या अधिकाधिक जवळ जाते. तुमच्या लहरीनुसार कुठेही असे नव्हे.


माणूस चुकू शकतो शिकू शकतो व सुधारू शकतो याच्यावरून कोणाचेही काहीही त्याच्या तिच्या परीने बरोबरच असते असा निष्कर्ष कसा निघू शकेल? 

No comments:

Post a Comment