Friday, July 17, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच -१०

१) पुढील शब्दांचा नेमका अर्थ काय?(जसा नोकर-चाकर पैकी चाकर म्हणजे  
   पडेल ते घरगुती काम करणारा)
   --रजवाडे, ---उमराव --दरकदार, --चोपदार, --किन्नर, , ---जुमला, ---नारू,  
   ----देवस्की, ---अर्चा, ---पुस्त, ---मरातब, ------इतबारे, ----कज्जे, ---काज   
  जारण-मारण मधील जारण म्हणजे काय?

२) लागणे या क्रियापदाला मराठीत एकूण किती अर्थ आहेत.
   [सूचना: बंदराला बोट लागली हे एकदा मोजले की फलाटाला गाडी लागली   
    हे वेगळे मोजता येणार नाही. झाडाला आंबे लागले म्हटल्यावर वेलीला  
    घोसावळी हे चालणार नाही, इत्यादी]

३) स्वर्गाला अमूत्र असे का म्हणतात

४) सालंकृत-कन्यादान, अल्पोपहार (की अल्पोपाहार), सुस्वागतम्
  यांत द्विरुक्ती टाळल्यास काय म्हणता येईल?

५) दीनानाथ हा समास दीनांचा नाथ असा सोडवला तर संधी कसा सुटेल?

६) लोहचुंबक हा शब्द लोहाकर्षक असा केल्यास काय फायदा होईल?

७) समास सोडवा: कंठस्नान, माकडहाड, पुण्यश्लोक, पुण्यतिथी, राजर्षी,  
   गंगावन, लोटांगण,

८) काही सरकलेले अर्थ(मूळ अर्थ किंवा उचित प्रतिशब्द सांगा)
   अनभिषिक्त म्हणजे अनाव्हानित नव्हे तर--
   विहंगम म्हणजे रमणीय नव्हे तर ----
   निरलस म्हणजे निस्वार्थी नव्हे तर----
   आरती म्हणजे स्तवन नव्हे तर---
   प्रच्छन्न म्हणजे उघड उघड नव्हे----
   उच्छृंखल म्हणजे चंचल नव्हे तर---
   निस्पृह म्हणजे कठोर नव्हे तर----
   उदासीन म्हणजे विमनस्क नव्हे तर----
   अपरोक्ष म्हणजे दृष्टीआड/अनुपस्थितीत नव्हे तर---
 
No comments:

Post a Comment