१)
एक हायड्रोजन-आयन
आणि एक प्रोटॉन या भिन्न गोष्टी आहेत की ती एकच गोष्ट आहे? आणि का?
रासायनिक दृष्ट्या आणि विद्युतभार म्हणून पहाता हायड्रोजन
आयन आणि प्रोटॉन ही एकच गोष्ट आहे. परंतु प्रोटॉन्स हे सामान्यतः केंद्रकातील
केंद्रकर्षुक क्षेत्रा (न्यूक्लिअर फील्ड = जी शक्ती परस्पर-प्रतिसारक असलेल्या प्रोटॉन्सना
एकमेकांसमवेत व न्युट्रॉन्ससमवेत एकत्र राखते) मध्येही भाग घेत असतात. हायड्रोजन
आयन‘मध्ये’ जो प्रोटॉन असतो तो या कर्षुकातून मुक्त असतो. कोणतीही
गोष्ट ‘काय’ आहे हे फक्त तिच्या एकटीकडे बघून ठरत नाही तर ती कशाचा
घटक म्हणून कार्य करते यानेदेखील ठरते.
२)
चंद्राची
पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा या
समप्रतलीय(इन द सेम प्लेन) नाहीत याचा सोपा आणि निर्विवाद पुरावा कोणता?
जर तसे नसते, म्हणजेच या कक्षा समप्रतलीय असत्या तर प्रत्येकच
पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि प्रत्येकच अमावस्येला सूर्यग्रहण झाले असते. पण असे होत
नाही.
३)
विषुववृत्ता जवळील
प्रदेशातील मूळ निवासींचा रंग काळा असतो. हे तेथील भौगोलिक परिस्थितिशी झालेले अनुकूलन आहे काय?
जास्त उन्हामुळे त्वचा काळी बनत जाणे हे कारण-दृष्ट्या बरोबरच
आहे. परंतु जास्त उष्णता शोषून घेतली न जाण्याची गरज खरेतर विषुववृत्ता जवळ
जास्त आहे. मानवी प्रयोजन आणि नैसर्गिक कारणपरंपरा यांचे जुळतेच असे नाही.
त्यामुळे हे अनुकूलन किंवा सिलेक्शन(उत्क्रांतीतले) नाही. उलट प्रति-कूलन-च आहे व
ते अजिबात ‘कूल’(इंग्लिश) नाही!
४)
भारतात उत्कृष्ट
तंतूवाद्ये (वीणा वगैरे) बनविण्याची परंपरा होती व आहे. असे असूनही तारेची लांबी,
तारेचा ताण आणि तारेची घनता यांचा स्पंदद्रुती(फ्रिक्वेन्सी) असणारा गणिती संबंध
शोधण्याचे श्रेय पायथागोरस (तोच काटकोन-त्रिकोण फेम) यालाच द्यावे लागते. असे का?
स्वर बरोबर लागतो आहे किंवा नाही हे
थेट-प्रत्ययाने(इंटिट्युव्हली) कळू शकते. तसेच परंपरेने बसवलेली मापे परिणामतः
अचूक असू शकतात. परंतु अमूर्त पातळीवर गणिती प्रतिमान (मॉडेल) बांधणे ही वेगळीच
कला आहे ही कला ग्रीकांनी अगोदर प्राप्त केली होती. (याला एक तत्त्वज्ञानातील
कारणही आहे. ग्रीक आकाराना नित्य आणि द्रव्यांना अनित्य मानत असत. उलट भारतात
द्रव्ये नित्य व आकार अनित्य असे मानले गेले व त्यामुये विचारपद्धतीचा ‘घाट’च बदलला.)
५)
पाणी असून घनरूपात
आहे पण जे बर्फ नव्हे असे काही असते काय?
स्फटिकीभवन होणारी काही संयुगे त्याच्या रचनेत पाण्याचे
रेणू सामावून घेतात. (साखर तापवून पहा) हे पाणी बर्फ नसूनही घनरूपात असते. एखाद्या
गोष्टीचा गुण हा तिच्या एकटीचा नसून ती कशाचा घटक म्हणून उपस्थित आहे यावरही ठरत
असतो(प्रश्न१. मधील उदाहरणात मोठ्या अणूतील प्रोटॉन सहभाग-गुण प्राप्त करतो हे आपण
पाहिलेच आहे)
३) बद्दल... उत्तर बरोबर नाही वाटत. Wikipedia वर वेगळंच आहे...
ReplyDeletehttps://en.wikipedia.org/wiki/Human_skin_color
There is a direct correlation between the geographic distribution of UV radiation (UVR) and the distribution of indigenous skin pigmentation around the world. ... Researchers suggest that human populations over the past 50,000 years have changed from dark-skinned to light-skinned and vice versa as they migrated to different UV zones,[4] and that such major changes in pigmentation may have happened in as little as 100 generations (~2,500 years) through selective sweeps.
Whatever may be the cause, dark-skinned people will absorb more heat which is disadvantageous to them.
ReplyDelete