Friday, June 19, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ६


१)    इंद्रधनुष्य हे वर्तुळखंड (आर्क ऑफ अ सर्कल) [किंवा खूप उंचीवरून पूर्णवर्तुळसुध्दा] याच आकाराचे का दिसते?

२)    वयपरत्वे स्मरणशक्ती हळू हळू क्षीण होऊ लागते. हे घडताना सर्वात अगोदर विशेषनामे (माणसांची सिनेमांची कंपन्याची वगैरे नावे) न आठवण्याचा त्रास सुरू होतो. म्हणजे त्या व्यक्तीचे सगळे काही आठवते पण नावच नेमके आठवत नाही आणि दुसऱ्या दिवशी अचानक आठवतेसुध्दा. विशेषनामांबाबतीतच (प्रॉपरनाउन्स) हे सर्वप्रथम का व्हावे?

३)    एक-अनंतांश पण शून्य नव्हे म्हणजे इनफाईनिटेसिमल ही संकल्पना आत्मविसंगत नाही काय? तरीही त्यावर कॅल्क्युलस आधारलेले आहे व ते उपयोगी पडते हे कसे?

४)    एका हिऱ्यात हिऱ्याचे किती रेणू असतात हे सांगता येईल काय? (आकारमान अगदी सूक्ष्म मापात माहीत आहे असे मानून)


५)    टेलिफोन-नंबर ही संख्या आहे काय? का?

2 comments:

 1. १) इंद्रधनुष्य हे वातावरणातील पाण्याच्या थेम्बातून परावर्तीत झालेय सूर्यकिरणांमुळे बनते. प्रत्येक रंग हा एका विशिष्ट कोनात परावर्तीत होतो. निरीक्षक आणि सूर्य यांच्यात ठराविक कोन साधेल अशा बिंदूंचा संच वर्तुळाकार आकृतीच तयार करू शकतो.
  २) एक अंदाज... विशेषनामे ही माणसांच्या उत्क्रांतीमध्ये नजीकच्या काळात झालेली भर आहे.
  ४) टेलिफोन-नंबर ही संख्या नाही. कारण ती संख्येप्रमाणे वागत नाही. उदा. दोन टेलिफोन-नंबरच्या बेरजेला काहीच अर्थ नाही. In programming terms i believe its literal.

  ReplyDelete
 2. मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - 4 मधील प्रश्न ३ विषुववृत्ता जवळील प्रदेशातील मूळ निवासींचा रंग काळा असतो हे तेथील भौगोलिक परिस्थितिशी झालेले अनुकूलन आहे काय? याचे उत्तर जास्त उन्हामुळे त्वचा काळी बनत जाणे हे कारण-दृष्ट्या बरोबरच आहे. . . . त्यामुळे हे अनुकूलन किंवा सिलेक्शन (उत्क्रांतीतले) नाही. उलट प्रति-कूलन-च आहे

  मला वाटते हे उत्तर साफ चुकले आहे. त्वचा जास्त उन्हा मुळे काळी झाली असती तर ते "अक्वायर्ड ट्रेट" असते, व "अक्वायर्ड ट्रेट" इनहेरिट होत नाहीत. (उ. अनेक पिढ्या सुंता केली तरी भविष्यातील पिढ्या बिना फोरस्किन जन्म घेत नाहीत). विषुववृत्ता जवळील प्रदेशात उन जास्त कडक असते त्याच प्रमाणे अल्ट्रा व्हायोलेट किरणे पण जास्त कडक असतात. या किरणांनी त्वचेचा कर्क रोग होण्याची शक्यता वाढते. जनुकीय बदलां मुळे ज्यांच्या त्वचेत काळा रंग देणारे मेलामीन जास्त झाले त्यांना त्वचेच्या कर्क रोगा पासून वाढीव सुरक्षा मिळाली. विषुववृत्ता जवळील प्रदेशात म्हणजे जास्त अल्ट्रा व्हायोलेट किरणे असलेल्या प्रदेशात ही सुरक्षा महत्वाची होती, व म्हणून त्यांचे "सिलेक्शन" झाले.

  चेतन पंडित

  ReplyDelete