१) पुढील शब्दांचा नेमका अर्थ काय?(जसा नोकर-चाकर पैकी चाकर
म्हणजे पडेल ते घरगुती काम करणारा)
--रजवाडे, ---उमराव --दरकदार, --चोपदार, --किन्नर, , ---जुमला, ---नारू, ----देवस्की,
---अर्चा, ---पुस्त, ---मरातब, ------इतबारे, ----कज्जे, ---काज
एतबार म्हणजे विश्वास किंवा विश्वासार्हता
म्हणून इमाने-इतबारे म्हणजे प्रामाणिकपणे आणि विश्वासार्हतेने. काज हा कार्य चा
अपभ्रंश असून बंगालीत कामाला काजच म्हणतात. अर्चा म्हणजेच पूजा म्हणून पूजाअर्चा
ही द्विरुक्ती आहे. बाकी यक्ष आणि किन्नर यात नेमका काय फरक असतो वगैरे मलाही
नक्की माहीत नाही. तसेच उमराव दरकदार चोपदार यांचे सुध्दा
जारण-मारण मधील जारण म्हणजे काय?
वशीकरण म्हणजे काम-मोहात पाडणे (टु सेड्यूस) यार
चा अपभ्रंश जार म्हणजे विवाहबाह्य प्रियकर म्हणून जारण म्हणजे वशीकरण
२) ‘लागणे’ या क्रियापदाला
मराठीत एकूण किती अर्थ आहेत.
[सूचना: बंदराला बोट लागली हे एकदा मोजले की फलाटाला गाडी
लागली हे वेगळे मोजता येणार नाही. झाडाला आंबे लागले म्हटल्यावर वेलीला घोसावळी हे
चालणार नाही, इत्यादी]
सूचनेत दोन उत्तरे आलेली आहेतच त्या शिवाय-----
सुपारी लागणे म्हणजे तोठरा बसणे किंवा सुपारी
हवीशी वाटणे. फार लागलं नाही ना? मनाला लागलं यात पासून त्रास होणे: हा अर्थ येतो.
सातत्य: हा अर्थ ‘पाऊस लागला आहे’.
तहान भूक उत्सर्जनाचे वेग यांचे क्रियापद लागणे
हेच येते
संपर्क किंवा स्पर्श,
सुरुवात होणे ‘तेव्हा पासून तो हा व्यवसाय करू लागला’.
काहीतरी चिकटलेले असणे.
उलगडा म्हणजे अर्थ लागणे (कळणे).
वाईट निघणे: आंब्याची पेटी खराब लागली.
आड येणे: खणताना दगड लागला, लाकडात गाठ लागली.
सक्ती होणे: “हे करावंच लागेल” लागण होणे, लागवड करणे अशी मॉडिफाइड रूपेही
अनेक आहेत.
‘लागणे’चे एकूण अर्थ हा एक प्रोजेक्टच
होईल
३) स्वर्गाला अमूत्र असे का म्हणतात
स्वर्गातील जीवांचे
अन्न व पचन असेच असते की मल मूत्र हा प्रश्नच येत नाही अशी कल्पना असल्याने शब्दशः
अमूत्र असेच म्हणतात इहामूत्रफलभोगविराग म्हणजे येथील वा स्वर्गातील सुखभोगात
कोणताही रस न उरणे ही (वैराग्य येणे) केवलाद्वैत वाचण्यासाठी पूर्वअट आहे.
नित्यानित्यवस्तूविवेक, शमदमादिसंपत्तीषटक आणि मुमुक्षुता या साऱ्या अटी आहेत. हे
दुर्लक्षून कोणीही वाचन करतात वाद घालतात व साधनाही करतात.
४) सालंकृत-कन्यादान, अल्पोपहार (की अल्पोपाहार), सुस्वागतम्
यांत द्विरुक्ती
टाळल्यास काय म्हणता येईल?
अलंकृत
किंवा सालंकार, उपाहार किंवा अल्पाहार, स्वागतम् मध्येच सु आगत आलेले आहे त्याला
आणखी एक सु लावण्याची गरज नाही.
५) दीनानाथ हा समास दीनांचा नाथ असा सोडवला तर संधी कसा
सुटेल?
दीनांचा नाथ हे दीननाथ होईल दीनानाथ केले तर संधी दीन+अनाथ असा
सुटेल
व समास दीन आणि अनाथ असा म्हणजेच द्वंद्व ठरेल.
६) लोहचुंबक हा शब्द लोहाकर्षक असा केल्यास काय फायदा होईल?
कर्ष महत्त्वाचा
दर वेळी चुंबन होण्याची गरज नाही.
७) समास सोडवा: कंठस्नान, माकडहाड, पुण्यश्लोक, पुण्यतिथी, राजर्षी,
गंगावन, लोटांगण, शस्त्रसंधी,
कंठातून उडणाऱ्या रक्ताने स्नान,
राजर्षी (उदा शाहू महाराज) म्हणजे ऋषींचा राजाही
नव्हे व राजाच्या पदरी असलेला ऋषीही नव्हे.
ऋषितुल्य असा राजा असा अर्थ होतो. यात पहिले पद हे उद्देश्यपद आहे दुसरे
नव्हे यामुळे हा तत्पुरुष होत नाही पण अव्ययीभावही होत नाही म्हणजेच उपलब्ध
वर्गीकरणात राजर्षी बसत नाही.
गंगा आणि वन यांचा काहीही संबंध लागत नाही
गंगातीरी वेणीदान करण्याशी केस मिळण्याचा संबंध असू शकेल.
तसेच लोटा आणि अंगण नसून अंग लोटून देणे हा अर्थ
आहे. उपलब्ध वर्गीकरण अपुरे आहे हे उघड आहे.
८) काही सरकलेले अर्थ(मूळ अर्थ किंवा उचित प्रतिशब्द सांगा)
अनभिषिक्त म्हणजे
अनाव्हानित नव्हे तर—अधिकृतता
न मिळालेला
विहंगम म्हणजे
रमणीय नव्हे तर ----पक्ष्याने वरून पाहिलेले (प्लॅन
किंवा
गुगलमॅप)
निरलस म्हणजे
निस्वार्थी नव्हे तर----आळस न करणारा
आरती म्हणजे स्तवन
नव्हे तर- आर्त
पुकार पण प्रत्यक्षात स्तवनेच
असतात
प्रच्छन्न म्हणजे उघड उघड नव्हे----उलट छुपे आच्छादन
मधला च्छ पहा
उच्छृंखल म्हणजे
चंचल नव्हे तर--- साखळ्यांमधून मुक्त
निस्पृह म्हणजे
कठोर नव्हे तर---- निरिच्छ
उदासीन म्हणजे
विमनस्क नव्हे तर----उत् आसीन म्हणजे वर बसलेला
अपरोक्ष म्हणजे
दृष्टीआड/अनुपस्थितीत नव्हे तर---उलट समक्ष जेव्हा
आपण
अपरोक्ष म्हणतो तेव्हा खरे तर आपल्याला परोक्ष म्हणायचे असते
‘लागणे’चे एकूण अर्थ हा एक प्रोजेक्टच होईल असे तुम्ही म्हटले आहे. शाब्दबंध हे आयआयटी मुंबई येथील एका प्रकल्पात तयार झालेले साधन आहे. त्यात ह्यावर काम झालेले आहे. इंग्रजीत वर्डनेट नावाचा एक प्रकल्प आहे तसा मराठी भाषेसाठी शाब्दबंध प्रकल्प आहे.
ReplyDeleteशाब्दबंधात 'लागणे' ह्या क्रियापदाचे दिलेले अर्थ ह्या दुव्यावर पहा-
http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
This comment has been removed by the author.
ReplyDeleteवरील दुव्याच्या पानावर 'शोधा' असे लिहिलेल्या पांढऱ्या चौकटीत 'लागणे ' लिहा ( किंवा इथून कॉपी पेस्ट करा ) व सर्चवर क्लिक करा.
ReplyDelete